आटपाडी ग्रामपंचायतीचा निषेध करीत लवटेवस्ती व कौठूळी ग्रामस्थांचे उपोषण तिसऱ्या दिवशी मागे


 


आटपाडी ग्रामपंचायतीचा निषेध करीत लवटेवस्ती व कौठूळी ग्रामस्थांचे उपोषण तिसऱ्या दिवशी मागेआटपाडी/प्रतिनिधी : शिवसेनेच्या वतीने आटपाडी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले महिलांचे आंदोलन आज तिसऱ्या दिवशी माघारी घेण्यात आले. कौठुळी, आटपाडी ग्रामपंचायत प्रभाग 2 मधील लवटे वस्तीतील येथील महिला व ग्रामस्थांनी आटपाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळील दगडी खाण येथील कचरा डेपो हटवण्यासाठी आटपाडी तहसील कार्यालयासमोर गेले तीन दिवस उपोषण सुरु होते.तर विट्यातील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. परंतु आंदोलकांच्या कचरा डेपो हटवा मागणी संदर्भात ग्रामपंचायतीने लेखी आश्वासन दिले नाही. आटपाडीच्या सरपंच वृषाली पाटील, उपसरपंच प्रा. अंकुश कोळेकर, ॲड. धनंजय पाटील, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय गोसावी, ग्रामपंचायतीचे सदस्य, सहाय्यक गटविकास अधिकारी पंकज शेळके आदींनी आंदोलकांशी मागण्याबाबत चर्चा केली.या आंदोलनाला आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरगर, अनिलशेठ पाटील आदींनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला. परंतु कचरा डेपो हटविण्याबाबत ग्रामपंचायतीने असमर्थता दर्शवली. मात्र ग्रामपंचायतीने विखुरलेला कचरा एकत्रित केला. आटपाडीत प्रथमच तीन दिवस महिलांनी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जगताप व कौठुळी ग्रामपंचायती च्या उपसरपंच सौ रंजना मारुती मगर व युवा नेते बापूसाहेब मगर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण केले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी स्वतःहून ग्रामपंचायतीचा निषेध करीत आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे लेखी आश्वासन पत्र तहसीलदार यांना दिले. आंदोलन व ग्रामपंचायत यांच्यात मध्यस्थी साधण्याचे काम वेळोवेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured