स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबर उत्तम संस्कारही मिळतात ; मर्चंट नेव्ही अभियंता विश्वनाथ गायकवाड : ‘पंढरपूर पॅटर्न’ आणि ‘फाईव्ह सेंटेंन्सेस’ चे केले कौतुक


 


स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबर उत्तम संस्कारही मिळतात
मर्चंट नेव्ही अभियंता विश्वनाथ गायकवाड : ‘पंढरपूर पॅटर्न’ आणि ‘फाईव्ह सेंटेंन्सेस’ चे केले कौतुक
माणदेश एक्सप्रेस न्युजपंढरपूर : ‘माणसाच्या आयुष्यात ‘शिक्षण’ हा खूप महत्त्वाचा भाग असून शिक्षणामुळे आपले भवितव्य उज्वल होते. माझ्यावर देखील स्वेरीतच संस्कार झाले. डॉ. रोंगे सरांच्या सिस्टम मधून मी तयार झालो असून आज मला शिक्षणाचे किती महत्व आहे हे समजत आहे.  रोंगे सरांनी सातत्याने लिहण्यास सांगितलेल्या फाईव्ह सेन्टेन्सेस मुळे इंग्रजी भाषेचे किती महत्त्व आहे हे आज लक्षात आले.


 


स्वेरीतून ‘पंढरपूर पॅटर्न इन प्रोफेशनल एज्युकेशन’ अर्थात ‘ट्रिपल पीई’ मुळे सराव झाला. स्वेरीचा हा स्वतंत्र व स्वतःचा फार्मुला असून याचा आता पायंडा पडलेला आहे त्यामुळे सुरवातीला ‘फाईव्ह सेन्टेन्सेस’ काय आहेत हे माहित नव्हते पुढे याच फाईव्ह सेन्टेन्सेसनी माझ्या जीवनाचा अर्थ बदलवला.  त्यामुळे मी डॉ. रोंगे सरांना गुरु मानतो. एकूणच स्वेरीत मिळणाऱ्या शिक्षणामुळे जग बदलू शकते याचे कारण म्हणजे स्वेरीत शिक्षणाबरोबरच संस्कार देखील मिळतात आणि या सर्व गोष्टींचा आज मला फायदा झाला आहे.’ असे प्रतिपादन भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये अभियंता असलेले विश्वनाथ गायकवाड यांनी केले. स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून २०१० साली पदवी संपादन केल्यानंतर विश्वनाथ गायकवाड यांची स्वेरीतील कॅम्पस प्लेसमेंट मधून मर्चंट नेव्हीमध्ये भारतीय व्यापारी नौदल अधिकारी सेकंड इंजिनिअर म्हणून निवड झाली. सीबल्क ट्रॅडिशनच्या व्यापारी जहाजावर कार्यरत असलेले विश्वनाथ गायकवाड आज  जहाजावरून ब्राझील मधील पोर्ट परानागोवा येथून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन करत होते. पुढे गायकवाड म्हणाले कि, ‘ज्या क्षेत्रात तुम्ही कार्य कराल तेथे सक्षम अभियंता म्हणून जगात भारताचे नाव निर्माण करा. त्यासाठी स्वेरीने निर्माण केलेल्या शिस्तीचे व नियमांचे पालन करा. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यात प्रा.एम. एम. पवार सरांचा देखील बहुमोल वाटा आहे. कारण त्यांच्यामुळे आम्ही मुले निर्व्यसनी झालो. अभ्यासासाठी ते सतत पाठपुरावा करायचे.


 


त्यामुळे आम्ही आमचा अभ्यास वाढवला. स्वेरीमध्ये कष्टकऱ्यांची मांदियाळी आहे. त्यामुळे जिथे कष्ट तिथे जीवन फुलते. मी स्वेरीतून अभियंत्याचे शिक्षण मिळवले आणि इंजिनिअर म्हणून जीवनाचा प्रवास सुरू केला. माझी मर्चंट नेव्ही मध्ये नियुक्ती झाली. हे सर्व स्वेरीतील नियम व शिस्तीमुळे शक्य झाले. मी आजपर्यंत जवळपास बत्तीस देशांचा प्रवास केला आहे. जग सध्या भीषण संकटाला तोंड देत असून भविष्यकाळ अत्यंत अवघड आहे. आज मानवाने निसर्गावर प्रयोग करत करत स्वतःवर संकट ओढवून घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले. पंढरपूरची ओळख अध्यात्माबरोबरच आता स्वेरीतून मिळणाऱ्या शिक्षणामुळेही होत आहे. शिक्षण सर्वत्र मिळते परंतु शिक्षणाबरोबरच संस्कार ही स्वेरीत मिळतात.


 


स्वेरीत होऊ घातलेल्या अभियंत्यांचा मेंदू सशक्त करण्यासाठी मोठमोठे विचारवंत व वक्ते  आमंत्रित केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत खूप वाढ होते. म्हणून स्वेरीतील शिक्षणाचा शक्य तेवढा फायदा घ्या.' असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी जहाजावरील दुसरे सहकारी अभियंता प्रशांत यादव यांनी जहाजेचे कार्य कसे चालते याची माहिती दिली. गायकवाड यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनाने नूतन अभियंत्यांना नक्कीच पुढील दिशा मिळाली आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad