आटपाडी : मुसळधार पावसाने शुक्र ओढ्याला पुर ; पाणी पुलावर आल्याने वाहतूक बंद ; दुकानामध्ये शिरले पुराचे पाणी 

आटपाडी : मुसळधार पावसाने शुक्र ओढ्याला पुर ; पाणी पुलावर आल्याने वाहतूक बंद ; दुकानामध्ये शिरले पुराचे पाणी 


 


आटपाडी : मुसळधार पावसाने शुक्र ओढ्याला पुर ; पाणी पुलावर आल्याने वाहतूक बंद ; दुकानामध्ये शिरले पुराचे पाणी 
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : गेली तीन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आटपाडी तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पडणाऱ्या पावसाने आटपाडी शहरातून वाहणाऱ्या शुक्र ओढ्याला पूर आला असून पुराच्या पाण्याने रौद्ररूप धारण केले असून पाण्याचा प्रवाह जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गावभाग शाखेसमोरून असलेल्या रस्त्यावरून वाहत असल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरले आहे.


 तीन दिवस झाले आटपाडी तालुक्यासह शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. गेली दोन दिवस आटपाडी शहरातील बाजार पटांगण येथील पुलाला लागून पाणी वाहत होते. मात्र आजच्या झालेल्या धुवांधार पावसाने शुक्र ओढ्याचे पाणी पात्राबाहेर पडले असून पुलावरून पाणी वाहू लागले आहे. या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून आटपाडी पोलिसांनी सुरक्षा कवच उभे केले असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.तर आटपाडी-दिघंची राज्य मार्गावरून वाहणारा धांडोरे ओढ्याला ही मोठ्या प्रमाणात पाणी आले असून या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आले आहे. पुलाला लागुनच असलेल्या जाधव महाराज यांच्या मठामध्ये पाणी शिरले असून मठाला तळ्याचे स्वरूप आले आहे. तर तेथील रहिवाशी असलेल्या दिपक गवळी यांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments