साताऱ्यातील  उंब्रज मध्ये सफरचंदाचा मालट्रक पलटी 

साताऱ्यातील  उंब्रज मध्ये सफरचंदाचा मालट्रक पलटी 


 


साताऱ्यातील  उंब्रज मध्ये सफरचंदाचा मालट्रक पलटी सातारा : उंब्रज येथील  कऱ्हाडकडे जाणाऱ्या लेनवरील तारळी नदीच्या पुलानजीक काश्मीीरहून सफरचंद घेऊन निघालेल्या मालट्रक येथे गुरुवारी पलटी झाला. ट्रकचालक किरकोळ जखमी झाला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर महामार्गावर सफरचंदाचे विखुरलेले बॉक्सा अनेकांनी बॉक्सू पळवल्याची चर्चा नागरिकांत होती. 


 


पोलिसांनी सांगितले, की पुणे बंगळूर महामार्गावरील तारळी नदीच्या पुलावरील वळणावर ट्रक पलटी झाला. तो ट्रक काश्मींरहून सफरचंद घेऊन बंगळूरला निघाला होता. महामार्गावरील दुभाजकाला धडकून पलटी झाला. दरम्यान याठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी झाली. परंतु कोणीही ट्रकमधील लोकांना बाहेर काढण्यास पुढे आले नाही.  


 


ट्रकमध्ये सुमारे एक हजार सफरचंदाच्या पेट्या होत्या. अपघातानंतर पेट्या रस्त्यावर विखुरल्या होत्या. त्याचाच फायदा घेऊन नागरिकांनी सफरचंदाच्या पेट्या पळवल्या आहेत. सफरचंद घेऊन पळणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी हाकलून लावले व अडकलेल्या चालक-वाहकांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर पोलिसांनी महामार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून महामार्ग पूर्ववत केला.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments