आरक्षणासाठी अख्खं मंत्रालय जाळून टाकू : मराठ्यांचा ठाकरे सरकारला इशारा 

आरक्षणासाठी अख्खं मंत्रालय जाळून टाकू : मराठ्यांचा ठाकरे सरकारला इशारा 


 


आरक्षणासाठी अख्खं मंत्रालय जाळून टाकू : मराठ्यांचा ठाकरे सरकारला इशारा जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आता विविध संघटना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे, एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मराठा संघटनेचा मशाल मोर्चा येणार आहे, तर दुसरीकडे अखिल भारतीय मराठा महासंघाने आरक्षणासाठी अख्खं मंत्रालय जाळून टाकू असा इशारा दिल्याने खळबळ माजली आहे.
याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख म्हणाले की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर शाळा, महाविद्यालय प्रवेशासह नोकर भरती करू नये, सरकारचं धोरण म्हणजे मराठ्यांच्या मुलाचं मरण झालं आहे. मातोश्रीवर आक्रोश मोर्चा, मशाल मोर्चा आहे, आम्ही लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चा काढून जगाला आदर्श दिला असं त्यांनी सांगितले.
तसेच सरकार कोणाचंही असो, या नेत्यांनी स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी मंत्रालयातल्या फाईली जाळल्या आहेत, पुरावे नष्ट केले परंतु मराठा आरक्षणासाठी आता आम्ही सगळे मराठा तरूण अख्खं मंत्रालय जाळून टाकू. मराठ्यांनी तलवारी जोरावर सातासमुद्रापार ताब्यात घेतला आहे हा आमचा इतिहास आहे असा गंभीर इशारा अरविंद देशमुख यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments