भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग


माणदेश एक्सप्रेस न्युज
भिवंडी : भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरामध्ये एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. कारखान्यात कपड्यांचा मोठ्या प्रमाणात साठा असल्यामुळे आग पसरत चालली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.


 


  भिवंडीतील खोका कंपाऊंड परिसरात यंत्रमाग कारखाना आहे. आज सकाळी अचानक या कारखान्यात आगीचा भडका उडाला. कापडाचा मोठ्या प्रमाणात साठा असल्यामुळे काही क्षणात आगीने रौद्ररुपधारण केले. या कारखान्याला लागूनच रहिवासी परिसर असल्यामुळे एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण, यश आले नाही. स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.


  


 अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे. कारखान्यात आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. शॉर्ट सर्किटमध्ये आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.रहिवासी परिसर असल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


 


  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

Previous Post Next Post