“अमरिश पटेल यांचा धनशक्तीच्या बळावर विजय” : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल गोटे
“अमरिश पटेल यांचा धनशक्तीच्या बळावर विजय” : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल गोटेधुळे : धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल गोटे यांनी नाराजी व्यक्त केली. हा निकाल आपल्याला अपेक्षित होता. अमरिश पटेल यांनी धनशक्तीच्या बळावर हा विजय मिळवला आहे, असा आरोप गोटे यांनी केला. तसेच या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फुटली याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीतील निकालांचा महाविकास आघाडीच्या भवितव्यावर परिणाम होणार का, असे विचारले असता अनिल गोटे म्हणाले की, भाजपाचे नेते पहिल्या दिवसापासून हे सरकार पडेल म्हणून सांगत आहेत. मात्र असं सांगता सांगता एक वर्ष निघून गेलं. अशीच चार वर्षे जातील. सत्तेच्या सिमेंटने पक्ष एकत्र झालेले असतात, असे सरकार पडत नाही, असा दावा त्यांनी केला.महाविकास आघाडीच्या सरकारला तीन पक्षांचं सरकार काय म्हणता. केंद्रात अटलबिहार वाजपेयींचं २३ पक्षांचं सरकार होतं, पण ते पडलं नाही. मग हे तीन पक्षांचं सरकार का पडणार. भाजपाचे नेते काहीही म्हणतील. मी भाजपात राहिलोय. संघ, जनसंघ, भाजपा सर्व पाहिलंय. हे सरकार शरदचंद्र पवार यांनी आणलं आहे. जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी त्यांची इच्छा नसेल तेव्हा हे सरकार कोसळेल, असे विधान त्यांनी केले.Post a Comment

Previous Post Next Post