भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह ; मुंबई दौरा लांबणीवर पडण्याची शक्यता

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह ; मुंबई दौरा लांबणीवर पडण्याची शक्यताभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह ; मुंबई दौरा लांबणीवर पडण्याची शक्यता  


आटपाडी : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे कोरोना पॉझिटिव्ह झाले असून त्यांनी स्वतः याबाबत त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे.


 


कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने मी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर माझा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी. असं आवाहन जे. पी. नड्डा यांनी केलं आहे.  


जे. पी. नड्डा यांची निवड गेल्या वर्षीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झाली असून उत्तर प्रदेशात भाजपाला मिळालेल्या विजयात जे. पी. नड्डा यांचे मोठे योगदान आहे. तसेच ते नुकतेच मुंबई दौऱ्यावर येणार होते.  


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments