“लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तिच भूमिका महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची आहे” : भाजपा नेत्याची काँग्रेसवर टीका

“लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तिच भूमिका महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची आहे” : भाजपा नेत्याची काँग्रेसवर टीका

  “लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तिच भूमिका महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची आहे” : भाजपा नेत्याची काँग्रेसवर टीकामुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती. त्यावरूनच काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, राज्यातील एकंदरीत परिस्थितीवरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली.“लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तिच भूमिका महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची आहे,” असं म्हणत भातखळकर यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून काँग्रेसला टोला लगावला. यापूर्वी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकासमंत्री यषोमती ठाकूर यांनी काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे, असा इशारा देत आघाडी धर्माचे पालन सर्वानी करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

 राहुल गांधी यांच्याबाबत विधाने सहन केली जाणार नाहीत, असाच सूचक इशारा यातून ठाकूर यांनी दिला होता. काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे, असेही त्यांनी म्हटलं होतं.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments