Type Here to Get Search Results !

हिंदूंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर क्रिकेटपटू युवराज सिंगच्या वडिलांच्या अटकेची मागणी




 हिंदूंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर क्रिकेटपटू युवराज सिंगच्या वडिलांच्या अटकेची मागणी



नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडिल योगराज सिंग कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत असतात. शेतकरी आंदोलनादरम्यान योगराज सिंग शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पोहोचले होते. परंतु हिंदूंबाबत केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.



योगराज सिंग यांचं एक भाषण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते हिंदू महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. 



अनेकांनी योगराज सिंग यांचं हे भाषण नींदनीय, अपमानजनक आणि घृणा आणणारं असल्याचं म्हटलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये योगराज सिंग हे पंजाबी भाषेत बोलत आहे. यादरम्यान त्यांनी हिंदूंसाठी गद्दार या शब्दाचाही वापर केला. “हे हिंदू गद्दार आहे. शंभर वर्षांपासून मुघलांची गुलामी केली,” असंही ते यात म्हणताना दिसत आहे. तसंच महिलांबाबतही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यापूर्वी योगराज सिंग हे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies