शेतकरी प्रश्नांसाठी अमित शहांची कॉलर धरू : माजी खासदार राजू शेट्टीशेतकरी प्रश्नांसाठी अमित शहांची कॉलर धरू :  माजी खासदार राजू शेट्टी


कोल्हापूर : दिल्लीत शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आणि शेतकरी मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकार विरूध्द कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळताना पोलीस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली.  


यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांचीही कॉलर धरून त्यांना आंदोलनाबाहेर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने  कार्यकर्ते अधिक संतप्त होवून कार्यकर्ते पोलीसांच्या अंगावर धावून गेले. दरम्यान, पोलीसांनी माजी खासदार राजु शेट्टींची माफी मागावी, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देणे सुरु केल्या. यावर राजु शेट्टी यांनी पोलीसांनी त्यांचे काम केले आता शेतकरी प्रश्नांोसाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची कॉलर धरू असे उत्तर दिल्याने कार्यकर्ते शांत झाले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज  
Post a comment

0 Comments