आटपाडीतील सोमनाथ जाधव यांचा 16 लाख रूपये किंमतीचा बकरा झाला चोरी

आटपाडीतील सोमनाथ जाधव यांचा 16 लाख रूपये किंमतीचा बकरा झाला चोरी

 आटपाडीतील सोमनाथ जाधव यांचा 16 लाख रूपये  किंमतीचा बकरा झाला चोरीआटपाडी : आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या अवघ्या सहा महिन्याच्या बकऱ्याला तब्बल 16 लाख इतका दर आला होता. उच्चांकी दरामुळे मोदी बकरा आणि त्याचे पिल्लू हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात प्रसिद्ध झाले. यातील सोमनाथ जाधव यांचा 16 लाख रुपयांचा बकरा शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलिशान चारचाकी वाहनातून चोरून नेण्यात आला. या घटनेने आटपाडी शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबुराव मेटकरी यांचा मोदी नावाचा प्रसिद्ध बकरा दीड कोटी रुपयांचा आहे. त्याला आटपाडीच्या बाजारात 70 लाख रुपये इतका प्रचंड दराने मागणी झाली. पण तो त्यांनी विकला नाही. याच दिड कोटी किमतीचे बीज असलेले आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या अवघ्या सहा महिन्याच्या बकऱ्याला कार्तिक दिवाळी यात्रेनिमित्त भरलेल्या यात्रेत तब्बल 16 लाख इतका दर आला होता. सोमनाथ जाधव शेगदारमळा आटपाडी यांचा 16 लाख रूपये  किंमतीचा बकरा चोरी गेला आहे, तरी चोरी गेलेला बकर्याची माहिती देणाऱ्यास १०००००/- रु. रोख बक्षीस  दिले जाईल.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments