दिलीपबापू शिंदे यांचे दुःखद निधन

दिलीपबापू शिंदे यांचे दुःखद निधनआटपाडी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आटपाडी तालुक्याचे नेते विलासनाना शिंदे यांचे जेष्ठ बंधू दिलीपबापू भगवान शिंदे (वय ६०) रा. चिंचाळे यांचे दुःखद निधन झाले.
गलाई व्यवसायाच्या माध्यमातून परिवारासह इतर अनेकांना दानशूर वृत्तीने मदत करणारे दिलीपबापू देश विदेशात विखुरलेल्या गलाई बांधवांमध्ये लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या मागे पत्नी, मुले, बंधू, भगिनी इतर नातलग असा मोठा परिवार आहे. रविवार दि. २१ रोजी सकाळी ८.३० चिंचाळे येथील स्मशान भूमीत रक्षाविसर्जनाचा विधी संपन्न होणार आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस 


إرسال تعليق

0 تعليقات