Type Here to Get Search Results !

आटपाडी : कौठूळीचे उपसरपंच यांचा अपघातात मृत्यू



आटपाडी : कौठूळीचे उपसरपंच यांचा अपघातात मृत्यू 

माणदेश एक्सप्रेस न्युज 

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील कौठूळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांचा आटपाडी- दिघंची रोड वरील सावित्रीदेवी इंडस्ट्रीजवळ झालेल्या आज दिनांक ०६ रोजी झालेल्या  अपघातामध्ये मृत्यू झाला.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कौठूळीचे उपसरपंच व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आटपाडीचे शाखाअधिकारी सुभाष पाटील हे आटपाडीहून कौठूळीकडे निघाले होते. त्यांची दुचाकी सावित्रीदेवी इंडस्ट्रीजवळ ते त्यांच्या वस्तीकडे निघाले असता दिघंचीहून येणाऱ्या दुचाकी गाडीने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, सुभाष पाटील यांची दुचाकी शंभर फुट अंतरावर जावून पडली. 


यामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात जखम झाली. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले होते. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. तर दुचाकी वरील दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना आयुसीयु मध्ये दाखल करण्यात आला आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies