Type Here to Get Search Results !

मोठी बातमी : आटपाडीमध्ये विवाहित महिलेचा खुन



माणदेश एक्सप्रेस न्युज 

आटपाडी : आटपाडी शहरातील हॉटेल स्टार येथे एका विवाहित महिलेचा हॉटेल च्या खोलीत खुन झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आटपाडी शहरातील आटपाडी बाजार समितीच्या समोर हॉटेल स्टार व लॉज आहे. या ठिकाणी छाया मधुकर देवडकर (वय २७) रा. विठ्ठलनगर आटपाडी  व संशयित नानासो हणमंत देवडकर (वय ३३) रा. पिंजारी वस्ती निंबवडे  यांनी दिनांक ०४ मे दुपारी ४.०० च्या दरम्यान लॉज ची खोली बुक केली होती.


आज दिनांक ०६ रोजी सकाळ च्या सुमारास लॉज च्या रूम मधून दुर्गंधी येत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर रूमचा दरवाजा तोडण्यात आला. आत मध्ये छाया मधुकर देवडकर हिचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलीसांनी भेट दिली असून मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies