Type Here to Get Search Results !

उत्तर प्रदेश निवडणूक : सत्तेत आल्यावर “हा पक्ष” ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार




नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय क्षेत्रात चांगलीच चढाओढ बघायला मिळत आहे. जास्तीजास्त मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीकडून देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.






यासंदर्भात बोलत असतांना सिसोदिया म्हणाले की,’जर उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आले तर राज्यातील जनतेला ३०० यूनिट मोफत वीज दिली जाईल’. फक्त एव्हढेच नाही तर याविषयी सिसोदिया यांनी ट्विट देखील केले आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की,’उत्तर प्रदेशमध्ये नागरिकांना अवास्तव वीज बिलांपासून मुक्ती देण्यासंबंधी एक महत्वपूर्ण घोषणा…आम आदमी पार्टीचं सरकार आल्याच्या २४ तासांत प्रत्येक व्यक्तीस घरगुती वापरासाठी प्रत्येक महिन्याला ३०० यूनिट पर्यंत मोफत वीज मिळेल. दरम्यान, यासोबतच जुने वीज बील माफ, प्रत्येक घरी २४ तास वीज, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे देखील आश्वासन देखील आप कडून देण्यात आले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies