Type Here to Get Search Results !

वाहतूक मंत्रालयाकडून 5 हजार कोटींची बचत; जाणून घ्या सविस्तर माहिती.....



 


नवी दिल्ली : वाहतूक मंत्रालयानने लेह लडाखच्या रस्त्याच्या कामात तब्बल पाच हजार कोटी रुपयांची बचत  केली आहे. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत लोकसभेत बोलताना माहिती दिली. यावेळी नितीन गडकरी  यांनी MEIL या कंपनीची प्रसंशाही केली. हैदराबादमधील मेघा इंजिनिअरींग कंपनीने अत्यंत कमी खर्चात प्रकल्पासाठी निविदा भरली होती. त्याचा फायदा सरकारला झाल्याचे गडकरींनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकल्पाबाबत आणि मेघा इंजिनिअरींग एन्ट इन्फ्रानस्ट्रक्चर लिमिटेड कंपनीबाबत संसदेत कौतुक करण्यात आले आहे. काश्मीरमध्ये सुरु असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी जोझिला पास प्रकल्पाचा उल्लेख यावेळी करण्यात आला. जवळपास 12 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातूनही या प्रकल्पासाठी नावाजलेल्या कंत्राटदारांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र हैदराबादमधील मेघा इंजिनिअरींग कंपनीने अत्यंत कमी खर्चात या प्रकल्पासाठी निविदा भरली आणि या प्रकल्पाच्या दर्जेदार कामातून वेळेत काम पूर्ण होईल, याची खबरदारीरी घेतली आहे. त्यामुळे लोकसभेत गडकरींनी आपल्या भाषणात MEILचे खूप कौतुक केले आहे.



हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरींग कंपनीने अत्यंत कमी खर्चात या प्रकल्पासाठी निविदा भरल्याने केंद्र सरकारचे पाच हजार कोटी रुपये वाचले. अतिशय प्रतिकूल हवामानात जोझिला पासजवळ मेघा इंजिनीअरींग  वेगाने काम करत आहे. दुहेरी बोगद्याच्या या बांधकामात दररोज प्रगतीचा एक टप्पा गाठला जातोय. केवळ जलदच नाही तर सुरक्षितता आणि बांधकाम मानकांचे पालन करत दर्जेदार होत असलेल्या या कामाचे अनेक प्रशासनीक अधिकाऱ्यांनी कौतूक आणि प्रशंसा झाली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies