Type Here to Get Search Results !

‘या’नेत्याची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड! मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन!


मुंबई : मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज, सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.



तसेच, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधासभेत भाषण झाले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर अजित पवार यांच्या नावाला विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.



दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचे कौतुक केलं


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies