Type Here to Get Search Results !

प्रियकर जेवायला आला नाही म्हणून महिलेने केली आत्महत्या!



पिंपरी-चिंचवड:  पिंपरी-चिंचवडमध्ये मोशी परिसरात प्रियकर रात्री जेवायला लवकर न आल्याने एका महिलेने तिच्या घरात आत्महत्या केली आहे. सुलोचना नामदेव लेकुरवाड असे 30 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. 



सुलोचना यांच्या पतीने दोन वर्षापुर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर कामाच्या शोधात सुलोचना पुण्यात स्थायिक झाली. पुण्यात सगळीकडे कामाच्या शोधात होती. काही दिवसांनी त्यांनी घरकाम आणि स्वयांपाक करुन उदर्निवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्या रोज सकाळी संध्याकाळी कामाला जात असे. त्यांना चार मुली आहेत. या कामादरम्यान सुलोचना यांची एका व्यक्तीशी ओळख झाली. त्यांची मैत्री घट्ट होऊ लागली. मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघे मोशी परिसरात राहत होते. दोघेही वेगळ्या ठिकाणी राहत होते. मात्र जेवायला सोबत भेटायचे.



दरम्यान,  सुलोचना यांनी स्वयंपाक केला मात्र प्रियकर जेवायला लवकर आला नाही. वाट बघताना त्यांना संताप अनावर झाला. याच कारणामुळे सुलोचना यांनी आत्महत्या केली असावी , असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला  आहे. मात्र आत्महत्येचे मुळ कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies