Type Here to Get Search Results !

शाळेची भिंत कोसळली विद्यार्थ्यांच्या अंगावर ; विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर!


बीड : बीडच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून, मुलांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. बीडच्या कामखेडा गावांमध्ये  जीर्ण झालेल्या इमारतीत, शिक्षणाचे धडे देत असतांना, चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या मुलाच्या अंगावर, जीर्ण भिंतीचा काही भाग पडला. आणि यामुळे चिमुकल्या मुलाचा हात फ्रॅक्चर झाला आहे.  कुंदन विजय ओव्हाळ (वय 10 वर्ष) असे हात फ्रॅक्चर झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. जखमी कुंदन समावेत इतरही चिमुकले मुले या वर्ग खोलीत होते. मात्र सुदैवाने मोठी हानी टळली आहे.


बीड तालुक्यातील कामखेडा गावातील जिल्हा परिषेची उर्दू आणि मराठी माध्यमाची शाळा आहे. मात्र या शाळेच्या इमारतीच्या भिंतीकडे आणि छताकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने आज या शाळेची दुरवस्था झाली आहे. मराठी आणि उर्दू शाळेचे जवळपास 200 विद्यार्थी असलेल्या या शाळेतील काही वर्गखोल्यांचे छत, भिंती आणि पत्रदेखील तुटलेले आहेत. तर पर्यायी व्यवस्था नसल्याने, याच शाळेतील एका वर्ग खोलीत, चौथीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात होते. यादरम्यान अचानक जीर्ण वर्ग खोलीच्या भिंतीचा, काही भाग चिमुकल्या कुंदन ओव्हाळ याच्या अंगावर पडला. त्यामुळे त्याचा हात फ्रॅक्चर झाला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies