Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, रविवार १७ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतील. मौजमजेत वेळ घालवाल. कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल. आजचा दिवस आनंददायी ठरेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल.


वृषभ:-

शांत चित्ताने कामे करावीत. आरोग्य चांगले राहील. कामात मन रमेल. कलहाचे प्रसंग टाळावेत. छुप्या शत्रूंवर मात करता येईल.



मिथुन:-

बौद्धिक हटवादीपणा टाळावा. वैचारिक ताण घेऊ नका. बोलतांना संयम सोडू नका. चांगल्या कामासाठी अधिक वेळ काढावा. शब्दाने शब्द वाढवू नका.



कर्क:-

घरगुती कामात अधिक वेळ घालवाल. गोड बोलून कामे करून घ्याल. आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वादाचे प्रसंग समजुतीने हाताळा. घरातील वातावरण खेळकर राहील.



सिंह:-

मनातील इच्छाशक्ति प्रबळ ठेवा. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. भावंडांचे प्रेमळ सौख्य वाढेल.  आज बरीच कामे हातावेगळी करता येतील. यश पदरात पडून घ्याल.



कन्या:-

ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल.  कामात धरसोडपणा करू नका. कौटुंबिक गोष्टींसाठी वेगळा वेळ काढावा लागेल. इतरांना मदत करण्यात आनंद वाटेल. दिवसभर कामाची धांदल राहील.



तूळ:-

मनात हेतू ठेवून कामे कराल. दिवस चैनीत घालवाल. आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. मोठ्या योजनांची आखणी कराल. मनाच्या मर्जीला अधिक महत्त्व द्याल.



वृश्चिक:-

सडेतोड उत्तरे द्याल. येणी वसूल करावी लागतील. काही निर्णय घेताना त्रस्तता जाणवेल. दिवस काहीसा धावपळीत जाईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी.



धनू:-

माणसे ओळखून वागावे. व्यापार्‍यांना चांगला लाभ मिळवता येईल. अधिकारात वाढ होईल. अध्यापक वर्ग दिवसभर कामात गर्क राहील. नोकरदार वर्गाला लाभ होईल.


मकर:-

कामाची योग्य रूपरेखा ठरवावी. स्वावलंबनाची कास धरावी. पोटाचे त्रास संभवतात. सहकार्याने कामे करावीत. हातातील अधिकार वापरता येतील.



कुंभ:-

लोक निंदेला घाबरू नका. धार्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. भडक शब्दांचा वापर टाळावा लागेल. अति शिस्तीचा बडगा करू नका. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न करावा.



मीन:-

अचानक धनलाभाची शक्यता. हित शत्रूंवर मात करू शकाल. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. पित्त विकारांचा त्रास संभवतो. खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळावीत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies