Type Here to Get Search Results !

पतीनेच भररस्त्यात पत्नी व तिच्या प्रियकराची केली हत्या!



मध्य प्रदेश:  मध्य प्रदेशातील भोपाळ येथील अशोका गार्डनमध्ये एका पतीने बाजारपेठेच्या मध्यभागी पत्नी आणि तिच्या प्रियकराची चाकूने हत्या केली. रस्त्याने जाणाऱ्यांनी आरोपीला पकडून  पोलिसांच्या ताब्यात दिले.



याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,  कैलास नगरच्या सेमरा भागात सोमवारी रात्री एका व्यक्तीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची चाकूने खुपसून हत्या केली. मृत महिला पतीला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मृत महिला विदिशा जिल्ह्यातील रहिवासी होती. ती आपल्या ५ वर्षांच्या मुलीसह भोपाळला आली होती आणि तिच्या साथीदारासह सेमरा भागात राहत होती. विदिशामध्ये राहणाऱ्या पतीला हे कळताच त्याने भोपाळ गाठले आणि दोघाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तीन दिवस शोध घेतल्यानंतर सोमवारी रात्री संधी मिळताच त्याने दोघांची हत्या केली. 



दरम्यान,  पोलीसांनी आरोपीस अटक केली असून सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies