Type Here to Get Search Results !

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ‘या’ फॉर्म्युल्यानुसार खाते वाटप निश्चित!मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु, येत्या ७ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. अशी माहिती समोर येत आहे.तसेच,  आता सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या ७ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होईल. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतून सुद्धा हिरवा कंदील मिळाला असल्याची माहिती समोर येत आहे. ६०:४० च्या फॉर्म्युल्यानुसार खाते वाटप निश्चित असल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान,  राज्यात येत्या ९ ऑगस्टपासून मुंबईत विधासभेचे पावसाळी अधिवेशन घेण्याबाबत माहिती समोर येत आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या आधीच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies