Type Here to Get Search Results !

“सर्वात मोठी राजकीय दहीहंडी दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून फोडली”!



ठाणे:  गोविंदा थर लावून हंडी फोडतात मात्र आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झालं असून असेच थर यापुढे वाढत जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यापुढे उत्सव जोरात साजरे करा पण काळजी घेऊन करा, असे आवाहनही त्यांनी केले.



दरम्यान, टेंभी नाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली. तसेच, श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंदशी संपूर्ण मराठीत संवाद साधला. टेंभी नाक्याची दिघे साहेबांची दहीहंडी ही सर्वात मोठी आणि मनाची हंडी असल्याचे सांगत मला या उत्सवात बोलावल्याने मला अभिमान असल्याचे तिने सांगितले. या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावल्याने आपल्या सोबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने याचा विशेष आनंद असल्याचे तिने सांगीतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरळ स्टेजवर न जाता त्यांनी गोविंदशीही संवाद साधला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies