Type Here to Get Search Results !

“छगन भुजबळांना ‘पुन्हा’ अंडासेल दाखवण्याची वेळ आली आहे”



नाशिक : राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी भाजपकडून त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. त्यातच भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका केली आहे. 



छगन भुजबळ ही राष्ट्रवादीचे ओवेसी असल्याचा उल्लेख करत तमाम हिंदूंचा अपमान केला आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यामुळे विषारी गरळ ओकून हिंदू समाजात तेढ निर्माण करून दंगली घडविण्याचा कट आहे. आणि म्हणून माफी न मागता आपल्या हिंदू विरोधी भूमिकेवर ठाम राहणाऱ्या पवारांच्या हस्तकाला पुन्हा एकदा अंडासेल दाखविण्याची वेळ आता आली आहे, अशी जहरी टीका भुजबळांच्या विरोधात भाजपच्या तुषार भोसले यांनी केली आहे.



तसेच,  छगन भुजबळ यांनी माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर भाजप आंदोलन करेल आणि माफी मागायला भाग पाडू असा इशारा भाजपच्या उमा खापरे यांनी दिला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies