Type Here to Get Search Results !

आता ‘येथे’ होणार शिंदे गटाचा दसरा मेळावा!



मुंबई : यंदा दसरा मेळाव्यावरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आतापर्यंत शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच झाला आहे. यावेळी मात्र, शिवतीर्थावरील परवानगीसाठी शिंदे गटानेही महापालिकेकडे अर्ज केला होता. पण कायदा सुव्यवस्थेचा विचार करता आता शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच यासाठी उद्धव ठाकरे हे आग्रही आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिंदे गटाने हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.



दरम्यान, दसरा मेळावा घेण्याबाबत शिंदे गटाची बैठक पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार या बैठकीला उपस्थित असणार आहेत. पण आता शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies