Type Here to Get Search Results !

पार्सल घेवून आलेल्या डिलिव्हरी बॉयने तरुणीसोबत केले भयंकर कृत्य!



पुणे : पुणे येथे येवलेवाडी परिसरातील एका सोसायटीत शनिवारी रात्री जेवणाचे पार्सल घेवून आलेल्या डिलिव्हरी बॉयने एका १९ वर्षीय तरुणीचे चुंबन घेतल्याची घटना घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. रईस शेख (४०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, पीडित तरूणी येवलेवाडी परिसरातील एका सोसायटीत राहते. शनिवारी रात्री पीडित तरुणीने एका अॅपवर ऑनलाईन ऑर्डर मागवली होती. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी रईस शेख पार्सल घेवून आला. जेवणाचे पार्सल दिल्यानंतर आरोपी शेखने पीडित मुलीकडे पिण्याचे पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर आभार व्यक्त करणाच्या बहाण्याने शेखने पीडितेला चुंबन घेत हात पकडून तिचा विनयभंग केला.



दरम्यान, याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी शेखला अटक केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies