Type Here to Get Search Results !

गणेश मंडळांना दिलासा; मुख्यमंत्र्यांनी केली 'हि' मोठी घोषणा!



पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी आज पुण्यातील अनेक गणेश मंडळांना भेटी देत गणेश दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपनगरातील गणेश मंडळांना उद्या रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणुका काढण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे.



उपनगरातील गणेश मंडळे उद्या रात्री मिरवणुका काढत असतात. मात्र, रात्री १० वाजेपर्यंतच मिरवणुका काढायला परवानगी असते. त्यामुळे मिरवणुकींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी गणेश मंडळांनी मुख्यमंत्र्यांजवळ केली होती. गणेश मंडळांची मागणी मान्य करत मुख्यमंत्र्यांनी उद्या रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणुकांसाठी परवानगी दिली आहे.



दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी उद्या रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणुकांसाठी परवानगी दिली आहे.त्यामुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies