Type Here to Get Search Results !

दक्षिण आफ्रिकेकडून पाकिस्तान पराभूत ; रिव्ह्यू आफ्रिकेच्या बाजूने गेल्याने पाकिस्तानला धक्का



माणदेश एक्सप्रेस न्युज  : चेन्नई : चेन्नईत झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचे  वर्ल्डकप स्पर्धेतून आवाहन जवळ-जवळ संपुष्टात आणल्यात जमा आहे. एडन मारक्रमच्या झुंजार 91 धावांच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव केला. 



पाकिस्तानने दिलेल्या 270 धावांचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने पार करत विजयाची नोंद केली. पहिली फळी  ढासळल्यावर एडन मारक्रमने 91 धावांची खेळी केली. त्याला उसमा मीरने विजयासाठी 21 धावांची गरज असताना बाद करत रंगत निर्माण केली, पण तबरेज शमसी आणि केशव महाराजने विजय निश्चित केला. 



आफ्रिकेची 33 षटकांत 4 बाद 206 अशी मजल मारली होती, त्यावेळी विजय निश्चित वाटत होता. मात्र, पाकिस्तानने जोरदार कमबॅक करत सामन्यात रंगत निर्माण केली. मारक्रम मैदानात तोपर्यंत आफ्रिकेचा विजय निश्चित समजला जात होता, पण मोहम्मद वासिम ज्युनिअरने त्याला बाद करत पाकिस्तानला सामन्यात परत आणले. 46 व्या षटकांतील शेवटच्या चेंडूवर शमसी एलबीडब्लू झाला होता, पण रिव्ह्यू आफ्रिकेच्या बाजूनं गेल्याने पाकिस्तानला धक्का बसला आणि हाच सामन्याचा टर्निंग पाँईट झाला अन आफ्रिकेने विजय मिळविला.



तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला सुरुवातीपासूनच आपला डाव सांभाळता आला नाही. 5 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अब्दुल्ला शफीकच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली, जो 9 धावा करून बाद झाला. यानंतर सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दुसरा सलामीवीर इमाम उल हक 12 धावा काढून बाद झाला. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यानसेनने दोन्ही पाकिस्तानी सलामीवीरांची शिकार केली. त्यानंतर कर्णधार बाबर आणि फलंदाज रिझवान यांनी काही काळ डाव रोखून धरला आणि तिसर्याल विकेटसाठी त्यांच्यात 48  धावांची भागीदारी झाली, जी गेराल्ड कोएत्झीने 16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला (31) बाद करून मोडून काढले. 



त्यानंतर पाकिस्तानची चौथी विकेट 25.1 षटकात इफ्तिखार अहमदच्या रूपाने पडली, जो 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कर्णधार बाबर आझम 28व्या षटकात 50 धावांवर फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीचा बळी ठरला. त्यानंतर फलंदाजीसाठी सौद शकील आणि शादाब खान यांनी सहाव्या विकेटसाठी 84 धावांची (71 चेंडू) भागीदारी करून संघाला काहीशी स्थिरता मिळवून दिली. कोएत्झीने 40व्या षटकात शादाब खानला (43) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली आणि पाकिस्तानचा धावगती कमी केली.



त्यानंतर चांगली खेळी खेळत असलेला सौद शकील 43 व्या षटकात 52 धावा काढून बाद झाला. यानंतर शाहीन शाह आफ्रिदी 02 धावा करून 10वी विकेट म्हणून बाद झाला, चांगल्या खेळीकडे वाटचाल करणाऱ्या मोहम्मद नवाजने 24 आणि वसीम ज्युनियरने 7 धावा केल्या.



🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies