Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य , 28 ऑक्टोबर, 2023 ; जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...



मेष - आज मनाची एकाग्रता कमी झाल्याने मनास दुःख होईल. मानसिक ताण जाणवेल. गुंतवणूकीतून फारसा लाभ होणार नसल्याने आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. खर्चावर नियंत्रण ठेवा. 


वृषभ - जुन्या परंतु बालपणीच्या मित्रांच्या सहवासाने मनाला आनंद होईल. नवीन मैत्री सुद्धा होईल. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. तरीही दुपार नंतर सांभाळून राहावे लागेल. 


मिथुन - व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्यां कडून लाभ होईल. अर्थ प्राप्ती संभवते. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. 


कर्क - आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. शारीरिक दृष्ट्या आळस व मरगळ जाणवेल. पोटाचा त्रास संभवतो. कोणत्याही कार्यात नशिबाची साथ लाभणार नाही. 


सिंह - आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील. मानसिक व शारीरिक त्रास वाढतील. त्यामुळे प्रकृती बिघडेल. अचानक धनलाभ होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतो.          

                       

कन्या - आजचा सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे - पिणे व मनोरंजन ह्यात आनंदाने घालवाल. प्रकृतीस त्रास संभवतो. त्याच बरोबर अचानक धनलाभ झाल्याने आपली काळजी काही प्रमाणात दूर होऊ शकेल. 


तूळ - आज आपण दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात सुख - शांती लाभेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभाव उग्र बनेल. सबब वाणीवर नियंत्रण ठेवा. 


वृश्चिक - आज आपल्यातील मानसिक हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल साधावा लागेल. अभ्यास व कारकीर्द ह्या संबंधी कामात विद्यार्थ्यांना यश मिळेल. आपली कल्पनाशक्ती व साहित्य निर्मिती ह्यात नावीन्य दिसेल. 


धनु - निरर्थक वाद - विवाद टाळणे हितावह होईल. आईची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. दुपार नंतर स्वभावातील हळुवारपणा वाढेल. 


मकर - आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ व स्थिर विचार ह्यांना अग्रस्थान द्यावे लागेल. मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. स्थावर संपत्तीचे व्यवहार करताना सावध राहा. 


कुंभ - आज वाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राग व वाणी ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या - पिण्यात संयम बाळगा. सृजनशील क्षेत्रात मान - सन्मान मिळू शकेल. 


मीन - कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्ये तडीस जातील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजचा दिवस नवीन कामे हाती घेण्यास शुभ आहे. मनात नकारात्मक विचार येतील. 


(टीप : यातून माणदेश एक्सप्रेस कोणताही दावा करत नाही, फक्त माहिती पोचविणे हा उद्देश)

🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies