Type Here to Get Search Results !

माळशिरस तालुक्यातील “हा” सहकारी साखर कारखाना पहिला हप्ता २५०० देणार : कारखान्याचे गळीत हंगाम, काटा पूजन व बैल गाडी पूजन संपन्न



माणदेश एक्सप्रेस न्युज : माळशिरस/विष्णू भोंगळे : श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर या साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ चा ५० वा गळीत हंगाम  व काटा पूजन व बैल गाडी पुजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. गव्हाण  व मोळी पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी कै. काकासाहेब व अक्कासाहेब आणि स्व. सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ सभासद नामदेव लक्ष्मण सावंत व दस्तगीर हुसैन मुलाणी यांनी केले.


याप्रसंगी बोलताना श्री शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन तथा आम. रणजितसिंह मोहिते पाटील  यांनी श्री शंकर सहकारी कारखाना पहिला हप्ता  इतर कारखान्याच्या FRP प्रमाणे शेतकऱ्यांच्या उसाला दर देणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्यास भरपूर प्रमाणात ऊस गाळपास द्यावा असेही यावेळी सांगितले. तसेच या हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून 4.50 लाख में.टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे प्रतिपादन केले.


यावेळी प्रमुख पाहुणे शिवामृत दूध संघांचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, सहकार महर्षीचे व्हा. चेअरमन शंकरराव माने- देशमुख, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी व्हा. चेअरमन प्रकाश आप्पा पाटील, जेष्ठ नेते गणपतराव वाघमोडे, व्हा चेअरमन मिलिंद कुलकर्णी, मल्लसम्राट रावसाहेब आप्पा मगर, भाजपा माजी तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, शिवामृत दूध संघांचे व्हा. चेअरमन दत्तात्रय भिलारे, माळशिरस नगरपंचायत चे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, नातेपुतेच्या नगराध्यक्षा अनिता लांडगे, महाळुंगचे उपनगराध्यक्ष भिमराव रेडे-पाटील, सत्यप्रभादेवी रणजितसिह मोहिते पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, मा. उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील, भानवसे आबा, मानशिंग मोहिते, नामदेव ठवरे, कारखाना डिझाईनर गरड साहेब, बाबासाहेब कर्णवर, मार्केट कमिटी संचालक, लक्ष्मण पवार, अप्पासाहेब रूपनवर, सुधीर सुरवसे, BY राऊत वकील साहेब, केशव कदम, लिंगा पाटील, शिवामृत संचालक सचिन रननवरे, हरिभाऊ मगर,शरद आबा साळुंखे, भास्कर तुपे, नितीन मामा खराडे,  मा. जि.प सदस्य अरुण तोडकर, बबन गायकवाड, तानाजी पालवे, मोहन लोंढे, माऊली सूळ, विजय देशमुख, संजय काका मोटे, सहकार महर्षीचे संचालक लक्ष्मण शिंदे, हनमंत  शिंदे, सदाशिवनगर सरपंच विरकुमार दोशी,  पुरंदावडे सरपंच राणी मोहिते, उपसरपंच देविदास ढोपे कारखान्याचे संचालक, कारखान्याचे एक्झिकुटीव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, विविध संस्थाचे पदाधिकारी, शेतकरी सभासद, अधिकारी,कामगार,व्यापारी, ग्रामस्थ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies