Type Here to Get Search Results !

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या कार्तिकी एकादशीच्या महापूजेवरून मराठा समाजात फुट ; एका गटाचा विरोध मावळला तर दुसऱ्या गटाचा विरोध कायम



माणदेश एक्सप्रेस न्युज : पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठलाची कार्तिकी एकादशी गुरुवारी (दि.२३) असून मराठा समाजाचा एक गटाने उपमुख्यमंत्री महापूजेला आल्यास आमचा विरोध नाही, अशी भूमिका पत्रकार परिषदेतून मांडली. तर दुसऱ्या गटाने जर उपमुख्यमंत्री महापूजेला आले तर आडवणार अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे महापुजेवरून मराठा समाजात दोन गटात फुट पडली असल्याची चर्चा होत आहे.


मराठा समजाला आरक्षण मिळावे या करिता उपमुख्यमंत्री अथवा कोणताही मंत्री यांना महापूजेस येण्याबाबत मराठा समाजाने विरोध केला होता. मात्र सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सरकार सकारत्मक आहे. लाखो बांधवांना दाखले मिळाले आहेत. 


त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी महापूजेस यावे तसेच विठ्ठला चरणी हात ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्यास शंभर टक्के कटिबद्ध आहोत, असे जाहीर करावे, अशी मागणी सकल मराठा समाज व क्रांती मोर्चाने जाहीर केली. या वेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, दीपक वाडदेकर, संतोष कवडे, विनोद लटके, सुमित शिंदे आदी उपस्थित होते. तसेच या बाबत एक निवेदन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.


मात्र या भूमिकेला मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री यांनी शासकीय महापूजेस येवू नये, हट्टाने आले तर होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. आमचा विरोध कायम असल्याची भूमिका गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर केली.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies