Type Here to Get Search Results !

बघावं ते नवलंच ! एक दोन हजाराचा नाही तर तब्बल तरूणाने घातला 20 लाख रूपयाच्या नोटांचा हार; व्हिडीओ पहाच...

 


तुम्ही अनेकदा लग्नांमध्ये नवरदेवांना नोटांचा हार घातलेलं पाहिलं असेल. या हारात वेगवेगळ्या  रूपयांच्या नोटा लावलेल्या असतात किंवा एकाच प्रकारच्या नोटा असतात. पण सध्या सोशल मीडिया एक भलामोठा नोटांचा हार असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक-दोन लाख नाही तर तब्बल 20 लाख रूपयांच्या नोटा लावल्या आहेत. 


एका तरूणाने फेमस होण्यासाठी असं केलं. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक तरूण घराच्या छतावर उभा आहे. त्याच्या गळ्यात हा भव्य हार आहे जो खाली जमिनीपर्यंत पसरला आहे. या हारात 500 च्या नोटा माळण्यात आल्या आहेत.


व्हिडिओत ज्या तरूणाला नोटांचा हार घातला आहे त्याला बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. बरेच लोक त्याचा व्हिडीओ काढताना दिसत आहेत. असा दावा केला जात आहे की, या हारामध्ये साधारण 20 लाख रूपये लावण्यात आले आहेत.



व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies