Type Here to Get Search Results !

कार्तिकी एकादशीला कुठल्याही उपमुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही; मराठा क्रांती मोर्चाने दिला इशारा


मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात शासकीय महापूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. तसेच यावर्षी शासकीय महापूजेसाठी कुठल्याही उपमुख्यमंत्र्यांना बोलावू नये.


 अशी मागणी मराठा समाजाकडून मंदिर समितीच्या बैठकीत करण्यात आली. त्यानंतर यावर्षी कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी कुठल्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही, असा निर्णय मंदिर समितीकडून जाहीर करण्यात आला आहे. 


मराठा समाजाच्या प्रक्षोभानंतर मंदिर समितीने हा निर्णय घेतला असून, मंदिर समिती मराठा समाजाच्या भावना राज्य सरकारला कळवण्यात येणार आहे. गहिनीनाथ महाराज औसेकरांसह विठ्ठल मंदिरी समितीच्या अध्यक्षांची बैठक झाली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली. 


आज पंढरपूर येथे सर्व मराठा समाज आज निवेदन देऊन गेला आहे. यावेळेस किंवा मराठा आरक्षणाबाबतचा संपूर्ण निकाल लागेपर्यंत पंढरी क्षेत्रामध्ये आम्ही कुठल्याही मंत्र्याला येऊ देणार नाही. 


ही गोष्ट आम्ही महाराष्ट्र सरकारच्या कानावर आणि विधी आणि न्याय विभागाच्या कानावर घालू,  मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी सांगितले.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies