Type Here to Get Search Results !

Manoj Jarange Meeting: मनोज जरांगे यांची सांगली जिल्ह्यातील “या” ठिकाणी होणार सभा ; आटपाडी तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव जाणार सभेला



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी :  मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे-पाटील हे आपल्या महाराष्ट्राचा दौरा सुरू करत आहेत. या दौऱ्याला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.  सांगली जिह्यातील  विटा येथे शुक्रवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सकाळी श्री चौंडेश्वरी मंदिर चौकात सांगली जिल्ह्यातील पहिली सभा होत आहे.


 ही सभा यशस्वी होण्यासाठी सकल मराठा समा जाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या सभेसाठी आटपाडी तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव या सभेला जाणार असून याबाबत प्रत्येक गावा-गावातून याचे नियोजन करण्यात आले आहे.


अशी असणार पार्किंग व्यवस्था

विटा येथे होणारी सभा मोठी असल्याने शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण व्यापार पेठ बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी सभेसाठी येणाऱ्या चार चाकी आणि दोन चाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था ही करण्यात आली असून यामध्ये खानापूर रस्त्या कडून येणाऱ्या वाहनांसाठी पालखी मैदानावर पार्किंगची व्यवस्था केली आहे. लेंगरे आणि साळशिंगे रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी महात्मा गांधी विद्यालयाशेजारील मैदानात पार्किंग असेल. मायणी रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी आदर्श महाविद्यालयासमोरील जागेत पार्किंग व्यवस्था ठेवली आहे. 


कराड आणि नेवरी रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी क्रांतीसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ तसेच विटा हायस्कूलच्या समोरील मैदानात पार्किंग ची व्यवस्था केली आहे. पलूस आणि तासगाव कडून येणाऱ्या वाहनांची व्यवस्था शंभर फुटी रस्त्याकडेला पार्किंग व्यवस्था ठेवण्यात आली आहे.




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies