Type Here to Get Search Results !

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरची सलग दोन शतके : रचले ‘हे’ विक्रम



भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध 50 षटकांत 4 गडी गमावून 397 धावा केल्या. यामध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतके झळकावली. अय्यरने 70 चेंडूत 105 धावांची खेळी केली. अय्यरची फटकेबाजी दिवाळीतल्या आतषबाजी सारखी राहिली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 8 षटकार ठोकले. अशाप्रकारे अय्यरने सलग दुसऱ्या सामन्यात शतकाचा टप्पा ओलांडला. यासह तो विश्वचषकात सलग दोन शतके फटकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम राहुल द्रविडने केला होता. 1999 च्या विश्वचषकात द्रविडने सलग 2 शतके झळकावली होती.


श्रेयसच्या नावावर हे  विक्रम 

त्याच बरोबर श्रेयस अय्यरनेही या विश्वचषकात 500 हून अधिक धावा केल्या आहेत. इतकेच नाही तर त्याने आपल्या इनिंगमध्ये 8 षटकार मारून एक मोठा विक्रमही केला. विश्वचषकाच्या कोणत्याही सामन्यात इतके षटकार मारणारा अय्यर हा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. त्याच बरोबर सेमीफायनलमध्ये भारतासाठी सर्वात मोठी धावसंख्या बनवण्याच्या बाबतीत श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. 


अय्यरचे सलग दुसरे शतक

विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रेयस अय्यरने बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर नेदरलँडविरुद्ध शतक झळकावले होते. त्या सामन्यात अय्यरने 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 94 चेंडूत 128 धावा तडकावल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये त्याने शतक झळकावून इतिहास रचला आहे. या सामन्यात त्याच्या आधी विराट कोहलीने शतक साजरे केले. तो 113 चेंडूत 117 धावा करून टीम साऊथीचा बळी ठरला. विराटचे हे वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक ठरले. अशाप्रकारे तो वनडे इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला.




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies