Type Here to Get Search Results !

धक्कादायक: धावत्या बसने वाहनांना चिरडले; एकाचा जागीच मृत्यू



दिल्लीतील रोहिणी भागात डीटीसी बसने तब्बल १२ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका ३० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यूही झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आरोपी चालक संदीप हा रोहतकचा रहिवासी असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.


डीसीपी गुरिकबाल सिद्धू यांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात मदर डिव्हाईन स्कूलजवळ झाला आणि पीसीआर कॉल मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना कळले की जखमी व्यक्तींना बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


तेथे पोहोचल्यावर माहिती मिळाली की एका ३० वर्षीय व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, डीटीसी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies