Type Here to Get Search Results !

World Cup च्या अंतिम सामन्यातील विराट आणि लाबुशेन मधील एकमेकांना खुन्नस देतानाचा VIDEO होतोय व्हायरल



World Cup 2023 च्या अंतिम सामन्यातील विराट आणि लाबुशेन मधील एकमेकांना खुन्नस देतानाचा VIDEO होतोय व्हायरल होत आहे. अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचं लक्ष्य दिले होते. सुरुवातीच्या षटकांत तीन विकेट्स पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेनने खेळ सावरला अन ऑस्ट्रेलियाला सहावा World Cup जिंकून दिला. दरम्यान, विराट कोहली आणि मार्नस लाबुशेनचा खुन्नस दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


सामन्याच्या ९ व्या षटकाच्या समाप्तीनंतर विराट कोहली आणि लाबुशेन यांच्यात खुन्नस पाहायला मिळाली. दोघंही किमान २० सेकंद एकमेकांकडे एकटक रागाने पाहाताना दिसले. यामुळे मैदानातील तणाव वाढताना दिसला. ९ व्या षटकाच्या समाप्तीनंतर कोहली दुसर्याक टोकाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी जात असताना दोन्ही खेळाडूंनी किमान २० सेकंद एकमेकांकडे रागाने पाहिलं. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


विराट आणि लाबुशेन मधील एकमेकांना खुन्नस देतानाचा VIDEO पाहण्यासाठी क्लिक करा


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies