Type Here to Get Search Results !

भरदिवसा तरुणाचा चाकूने वार करून खून ; पोलीस तपास सुरु



कराड : कराड येथील कार्वेनाका परिसरात शनिवारी भरदिवसा युवकावर एकाचा चाकूने वार करून खून झाला असून हल्लेखोर फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खुनाचे कारण समजू शकले नाही. शुभम रविंद्र चव्हाण असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील कार्वे नाका येथे शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास शुभम चव्हाण याच्यावर अज्ञाताने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. 


हल्लेखोर संशयित घटनास्थळावरून पसार झाला आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी शुभमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.  पुढील तपास पोलीस करत आहेत. 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies