Type Here to Get Search Results !

प्रेमासाठी कायपण ! प्रियकरासाठी सातासमुद्रापार आली प्रेयसी; देश-विदेशी जोडीचा लग्नाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

 


सध्या एका आगळ्या-वेगळ्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. कारण एक विदेशी तरुणी भारताची सून बनली असून ती आपल्या प्रियकरासाठी सातासमुद्रापार आली आहे. २५ नोव्हेंबरला ती उत्तर प्रदेशाती फतेहपूरला आली आणि बुधवारी रात्री कुटुंबीयांच्या उपस्थितीत या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. 


राधेलाल वर्मा यांना ३६ वर्षीय निशांत वर्मा आणि ३२ वर्षीय हार्दिक वर्मा अशी दोन मुले आहेत. हार्दिक वर्मा ८ वर्षांपूर्वी नोकरीसाठी नेदरलँडला गेला होता. तो इथे एका फार्मास्युटिकल कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता.


कंपनीत काम करत असताना, हार्दिकटी भेट नेदरलँडच्या बार्नेवेल्ड शहरात राहणाऱ्या गैबरीला डुडाशी झाली. भेटीनंतर त्यांचा एकमेकांवर जीव जडला. दोघांनीही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षे एकत्र राहिल्यानंतर भारतीय प्रियकर आणि परदेशी प्रेयसी गैबरीला डुडाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


गुजरातमधील गांधीनगर येथील घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा साखरपुडा केला. हार्दिक वर्माचे वडील राधेलाल वर्मा गेल्या ४० वर्षांपासून गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये राहतात. २६ नोव्हेंबर रोजी राधेलाल कुटुंबीयांच्या उपस्थितीत हळदी समारंभ पार पडला. तर २८ आणि २९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री दोघांचे लग्न धुमधड्याक्यात पार पडले.



व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies