Type Here to Get Search Results !

माडगुळे येथील महिलेची दुचाकीस्वारा कडून फसवणूक ; सोन्याची बोरमाळ, कानातील कर्णफुले, रोख रक्कम केली लंपास



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथील महिलेस मोदी पेन्शन योजनेतील पैसे काढून देतो असे सांगत तिला दुचाकीवर बसवून आणत तिच्या गळ्यातील अर्धा तोळ्याची बोरमाळ व कानातील फुले अज्ञात दुचाकीस्वाराने लुटल्याची घटना काल दिनांक ०३ रोजी दुपारी १२.४५ च्या दरम्यान  घडली.


याबाबत अधिक माहिती अशी, माडगुळे येथील लक्ष्मी आप्पा काटे (वय ६५) ही महिला आटपाडी येथे आली होती. ती माडगुळे येथे जाण्यासाठी थांबली असता अज्ञात दुचाकीवर आलेल्या व्यक्तीने सदर महिलेला मोदी पेन्शनचे तीस हजार रुपये काढून देण्याचे आमिष दाखवत तिला मोटारसायकलवर बसवले.


आटपाडी-खानजोडीवाडी रस्त्यावर आल्यावर त्या अज्ञात दुचाकीस्वाराने महिलेच्या गळ्यातील अर्धा तोळ्याची बोरमाळ व कानातील फुले व रोख रक्कम दोन हजार रुपये तिच्याकडून फसवून काढून घेत पोबारा केला.


सदर घटनेबाबत आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच सदर महिलेने आटपाडी पोलिसात अज्ञात दुचाकीस्वारा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies