Type Here to Get Search Results !

बघावं ते नवलंच ! मृत वडिलांच्या फोटोला तरुणीने लावला नको तो फिल्टर तरुणीचा हा Video पाहून...



सध्या झालेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक तरुणी तिच्या दिवंगत वडिलांच्या हाराने सजवलेल्या फ्रेमच्या बाजूला उभी असलेली दिसतेय. या मुलीने आपल्या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा ऑन करून ‘कुत्रा’ फिल्टर सुरु केला आहे. या फिल्टरने तिलाच नव्हे तर फ्रेममधील वडिलांना सुद्धा कॅप्चर केलं असून काही सेकंद हा व्हिडीओ तसाच चालू असल्याचे दिसतेय.


दरम्यान, हा व्हिडीओ खरा आहे की खोटा इथपासून अनेकांना प्रश्न आहे. पण जर या मुलीने खरोखरच असा व्हिडीओ बनवला असेल तर हा शुद्ध निर्दयीपणा आहे असे काहींनी कमेंटमध्ये लिहिले आहे. नशीब आम्हाला मुलं नाहीत, हे किती क्रूर आहे असं काहींनी कमेंटमध्ये म्हटल्याचे दिसतेय.


 तर एकाने यावर प्रतिक्रिया देताना कदाचित तिला तिच्या वडिलांसह खेळताना, मजा करतानाचा क्षण पुन्हा जगायचा असेल असं म्हणत तिची काहीशी बाजू मांडली आहे. तर सगळं ठीक आहे पण बिचाऱ्या दिवंगत वडिलांच्या फोटोतुन जेव्हा कुत्र्याच्या फिल्टरची जीभ बाहेर येते ते बघणं जरा डोक्यावरूनच जातंय अशी कमेंटही काहींनी केली आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies