Type Here to Get Search Results !

डॉ. नितीन बाबर यांना ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगोला : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातुन देण्यात येणारी शरद पवार इनस्पायर साहित्य फेलोशीपसाठी डॉ. नितीन बाबर यांची निवड आहे. या  फेलोशीपच्या माध्यमातून राज्यभरातील शेती, शिक्षण व साहित्य या तीन क्षेत्रात नवे काही करु पाहणाऱ्या, ध्येयाने झपाटलेल्या व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या होतकरु गुणवंत तरुणांना प्रोत्साहन देण्यात येते. 


यशवंतराव चव्हान सेंटर मुंबई येथे रविवार दिनांक १० डिसेंबर रोजी साहित्य फेलोशीप प्रदान करण्यात येणार आहे. शरद पवार साहेब आणि फेलोशिप सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ प्रदान सोहळा पार पडणार आहे.


डॉ. बाबर हे सांगोला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून सातत्याने त्यांचे शेती, ग्रामीण अर्थकारणावर संशोधनात्मक लेख विविध वर्तमान पत्रात प्रकाशित होत असतात. त्याचबरोबर त्यांचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. 


त्यांच्या या यशाबद्दल माजी कुलगुरू योगेंद्र नेरकर,  शिवाजी विद्यापीठ अधिष्ठाता प्रा.डॉ.एम.एस.देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांना जेष्ठ अर्थतज्ज्ञ कै.प्रा.डॉ.जे.एफ. पाटील यांचे मार्गदर्शन तर  सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य  प्राचार्य व सहकारी प्राध्यापकांचे सहकार्य लाभले आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies