Type Here to Get Search Results !

धक्कादायक : १ डिसेंबरपासून बेपत्ता असणाऱ्या चिमुकलीचा मृतदेह आढळला बंद खोलीत



नालासोपारा : सोमवारी सकाळी आठ वर्षीय बालिकेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.  तिचा मृतदेह घराजवळील एका बैठ्या चाळीतील बंद खोलीत प्लास्टिकच्या गोणीमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडला. चांदणी साह असे तिचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून ती घराजवळून बेपत्ता झाली होती.


वसई फाटा येथील वाण्याचा पाडा भागात जिल्हा परिषद शाळेजवळ राहणाऱ्या विजय रामायण साह यांची मुलगी चांदणी साह हिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.


सोमवारी सकाळी चांदणी राहत असलेल्या घराजवळील बैठ्या चाळीतील पाच नंबर खोलीतून कुजल्याचा वास येत असल्याने स्थानिकांनी रूमचे दार उघडले. तेव्हा आतमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत प्लास्टिकच्या गोणीमध्ये कोंबलेला तिचा मृतदेह आढळून आला. 


पेल्हार पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून विच्छेदनासाठी तो मुंबईला पाठविला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत चांदणी ही घराजवळच्या मराठी शाळेत तिसरीत शिकत होती. या बालिकेची हत्या कोणी आणि का केली, याचा पोलिस शोध घेत आहेत.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies