Type Here to Get Search Results !

धक्कादायक : डॉक्टर तरुणीने संपवली जीवनयात्रा; कारण...



नवी दिल्ली : एका २६ वर्षीय महिला डॉक्टरने हुंड्याच्या मागणीमुळे आत्महत्या केली आहे. मृत तरूणी ही तिरुवनंतपुरम येथील मेडिकल कॉलेजची विद्यार्थीनी होती.

मृत तरूणीचे नाव शहाना असून ती तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया विभागात पीजीचे शिक्षण घेत होती. ती कॉलेजजवळील एका घरात भाड्याने राहत होती. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.


 शहानाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न मोडल्याने ती अस्वस्थ होती आणि त्यामुळेच आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. याच कॉलेजमधील डॉक्टरवर शहानाचे प्रेम होते आणि त्याच्याशी तिला लग्न करायचे होते. मात्र, संबंधित डॉक्टर लग्नासाठी हुंड्याची मागणी करत होता. 


माहितीनुसार, लग्न करण्यासाठी डॉक्टर तरूणाने हुंडा म्हणून सोने, जमीन आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी केली होती. मुलाची ही मागणी पूर्ण करण्यास मुलीचे कुटुंबीय असमर्थ होते. हे कळताच त्याने लग्नाला नकार दिला. लग्न मोडल्यामुळे शहानाला मोठा धक्का बसला अन् तिने टोकाचे पाऊल उचलले. 


 दरम्यान, पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षा वकील साथी देवी यांनी शहानाच्या आईची त्यांच्या घरी भेट घेतली. शहानाच्या आईने आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies