Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्यातील “या” नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द

   


माणदेश एक्सप्रेस न्यूज  : कोल्हापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने इचलकरंजीतील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँक, गंगाजळी संपल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करत होती. ४ डिसेंबर पासून, रिझर्व्ह बँकेने नूतन बँकेसाठी सर्व प्रकारचे व्यवहार तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असल्याने भाजप, संघ परिवाराशी निगडित या बँकेचे अस्तित्व कायमचे लयाला गेले आहे. शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेला दिवंगत अध्यक्ष शंकरराव पुजारी यांच्या काळात उर्जितावस्था प्राप्त झाली होती. त्यांच्या पश्च्यात त्यांचे सुपुत्र प्रकाश पुजारी यांच्याकडे अध्यक्षपद आल्यानंतर बँकेची अधोगती सुरु झाली. मे महिन्यात या बँकेवर रिझर्व्ह बँकेने ६ महिन्यांसाठी निर्बंध लादले होते.


रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आदेशात असे नमूद केले आहे की, शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड हि ४ डिसेंबरपासून कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देऊ शकणार नाही. बँकेला ठेवी स्वीकारण्यास किंवा निधी वितरित करण्यास पूर्णपणे प्रतिबंधित केले आहे. या सहकारी बँकेने बँकिंग सेवा प्रदान करणे सुरू ठेवण्यासाठी आवश्यक निकषांची पूर्तता केलेली नाही. शिवाय, भविष्यातील कमाईसाठी कोणतीही ठोस योजना तयार करण्यात बँकेला अपयश आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेचा परवाना रद्द करण्यात येत आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies