Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुका नागरी/ग्रामीण पतसंस्था संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी “यांची” निवड



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुका नागरी/गामीण विगरशेती सहकारी पतसंस्था संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी आदर्श सोसायटीचे सचिव दत्तात्रय सिध्देश्वर स्वामी यांची व उपाध्यक्षपदी सिरतुल पतसंस्थेचे सचिव सतिश गोवर्धन साळुखें व सचिव पदी राजमाता अहिल्यादेवी पतसंस्थेचे सचिव विरू गुंडा अनुसे यांची निवड करण्यात आली.


संघटनेच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात 'आली. तर सदस्य म्हणुन संत सावता माळी पतसंस्थेचे मॅनेजर तुकाराम जाधव, जयंत पाटील पतसंस्थेचे इन्नुस पठाण, चौंडेश्‍वरी पतसंस्थेचे बालक डोईफोडे, माणगंगा पतसंस्थेचे विजय पाटील, सिध्दनाथ पतसंस्थेचे महेश चांडवले, विरशैव पतसंस्थेचे प्रकाश शिंदे, सिध्दीविनायक पतसंस्थेचे चंद्रकांत पोळ, आटपाडी तालुका क्रेडीट सोसायटीचे दिलीप देठे, भास्करराव पतसंस्थेच्या सौ.सुमिता देशपांडे, आटपाडी क्रेडीट सोसायटीच्या सौ. मनिषा बालटे यांची निवड करण्यात आली.


कार्यकारणीतील नुतन अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांचा सत्कार वी डी मोहीते यांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत व प्रस्ताविक तुकाराम जाधव यांनी केले. सुत्रसंचालन व आभार सोमेश्वर महाजन यांनी मांडले.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies