Type Here to Get Search Results !

गोमेवाडीच्या सुपुत्राचा नागरी सत्कार संपन्न



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षकांची सेवक पतसंस्था आटपाडीच्या निवडणुक प्रक्रियेनंतर चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्या निवडी पार पड.ल्या यामध्ये नानासाहेब झुरे यांची बिनविरोध व्हा चेअरमनपदी निवड झाली. चेअरमन पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत रसिक सपाटे यांचा 7-4 अशा फरकाने पराभव करत किरण सोहनी यांची चेअरमन म्हणून निवड झाली.


किरण सोहनी हे गोमेवाडी गावचे सुपुत्र आहेत. त्यांच्या निवडीने गावामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे गावामध्ये त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सर्व गावकरी व रमाकांत भाऊ सोहनी युवामंच यांनी वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी गुरुसेवा सहकारी पॅनेलच्या विजयात मोलाची कामगिरी बजावलेल्या सर्व शिलेदारांचा गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. यशवंत गोडसे व जीवन सावंत यांनी शिक्षक राजकारणात निष्ठेला असणारे महत्व या निवडीने अधोरेखित केल्याचे सांगितले.



आपल्या मनोगतात माजी चेअरमन यु. टी. जाधव सर यांनी या निवडणुकीमध्ये किरण सोहनी यांनी घेतलेली भूमिका व त्याचा विजयात असलेला हातभार याबाबत गौरव व्यक्त केला. मा राज्यकर्याध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी यांनी शिक्षकांचे पंचप्राण संभाजीराव थोरात तात्या यांच्या नेतृत्वातील शिक्षक संघात गेली अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला चेअरमन पदाची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर जिल्ह्यातील भविष्यातील शिक्षक राजकारण हे सर्वसमावेशक व सामंजस्याचे ठेवण्यासाठीची माझी भूमिका असेल असे प्रतिपादन जगन्नाथ कोळपे यांनी केले.



या कार्यक्रमात संचालक सचिन खरमाटे, सदाशिव सरक,जनार्दन मोटे, ललिता पावणे, बिरू मुढे, पूजा मोरे, शामराव ऐवळे, चंद्रकांत महाजन, इंताब इनामदार, मारुती देवडकर, भिमराव सावंत, अंकुश गेजगे, यांचा सन्मान करण्यात आला.



या कार्यक्रमासाठी माजी उपसभापती हरिभाऊ माने, उपसरपंच सौ.पूजा अमोल जावीर, सदस्य उत्तम काळे, सदस्य सौ. राणी सोहनी, मा सरपंच रुपालीताई सरगर,रावसाहेब काळे, अध्यक्ष लक्ष्मण सरगर, उमाजी सरगर, भारत सोहनी, संतोष काऴे, मुन्ना मुलाणी, रामहरी कदम, बिरूदेव जावीर, रोहित सोहनी, विनायक अर्जुन, प्रा.श्रीकृष्ण पडळकर, मनोहर जावीर, सतिश सोहनी, नवल जावीर, रोहित देवकुळे, सोमनाथ देशपांडे, गिरीष झेंडे, सुभाष व्हनमाने, समाधान सोहनी, पवन चौगुले, अजय सोहनी व अध्यक्ष रमाकांत सोहनी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies