Type Here to Get Search Results !

आटपाडीतील होंडा शोरून समोर हाणामारी ; दोन्ही गटाकडून परस्पर फिर्यादी दाखल



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी बाजार समितीच्या उपसभापतीसह चौघावर फसवणुकीचा आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. तर होंडा शोरून मध्ये येवून आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची फिर्यादी सुभाष  गायकवाड यांनी दाखल केली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड यांचे भाऊ सुभाष गायकवाड यांचे जोगेश्वरी होंडा हे दुचाकी विक्रीचे शोरूम आहे. या ठिकाणी पडळकरवाडी ता. आटपाडी येथील भारत पडळकर हे शाईन गाडी घेण्यासाठी गेले होता. यावेळी पडळकर यांच्याकडून रोख दीड लाख रुपये घेवून त्यांना गाडी न देता, त्यांना यावेळी मारहाण करण्यात आली होती.


तर शोरूम मधील कामगार यांनी ही भारत पडळकर यांना मारहाण केली. तर सुभाष गायकवाड यांचे बंधू आटपाडी बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड यांनी त्यांना फोन वरून जीवे मारण्याची धमकी दिली.  याबाबत भारत पडळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सुभाष गायकवाड, राहुल गायकवाड यांच्यासह त्यांच्या शोरूम मधील दोन कामगार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तर सुभाष गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी भारत ज्ञानू पडळकर व इतर ०४ अनोळखी हे जोगेश्वरी होंडा शोरूम मध्ये आले होते. यावेळी त्यांनी मला ग्रे रंगाची शाईन गाडी आताच पाहिजे म्हणून वाद घालून निघून गेले व इतर १० ते १५ जणांना घेवून येत आरोपी भारत ज्ञानू पडळकर याने फिर्यादी सुभाष गायकवाड यांना लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. याबाबत दोन्ही गटाकडून परस्पर फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून सदर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies