Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या जाहीर सभेत अनिल बाबर यांचे गाणं ; सभेतील अनिलभाऊ बाबर यांच्या गाण्याने कार्यकर्ते भावून



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : शिवसेनेची कोल्हापूर मध्ये सभा होती. या सभेमध्ये, ‘धमक न्यारी, कामाला भारी, मोठ्या मनाचा तो राजा, माणूस साधा पक्का इरादा, चहूकडे गाजावाजा, अनिलभाऊंचा विजय असो! हे गाण वाजायला लागले अन अनिलभाऊंच्या कार्यकर्त्यांना भारावून आले. 


शिवसेनेच्या दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशनास पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. यावेळी शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार व मंत्री उपस्थित होते.  खानापूर मतदार संघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांचे निधन झाल्याने त्यांची उणीव या सभेमध्ये जाणवत होती. सभेला मोठ्या संख्येने खानापूर व आटपाडी तालुक्यातून कार्यकर्ते गेले होते. यावेळी सभेच्या मुख्य स्टेज वरून अनिलभाऊ बाबर यांचे प्रचार गीत असलेले गाणे चालू झाले अन सभेचे वातावरणच बदलून गेले.


अनिलभाऊ बाबर यांचे गाणे सुरु झाल्यावर यावेळी अनिलभाऊ बाबर यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते भावून झाले होते. यातील काहींना अश्रू देखील अनावर झाले होते. या सभेमध्ये अनिलभाऊ बाबर यांची उणीव उपस्थिताना जाणवत होती. अनिल भाऊ बाबर यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी सभास्थळी स्टेजवर उपस्थित राहत कार्यकर्ते कार्यकर्त्यांना अभिवादन केले. 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies